जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल या दोन्ही रुग्णालयांचा भव्य उद्घाटन सोहळा १७ ऑक्टोबर रोजी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

या सोहळ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर दीपमाला काळे, माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, जामनेरचे नगरसेवक जितेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, जळगाव सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन डॉ. आकाश चौधरी यांच्यासह जळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक आणि शहरातील प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही रुग्णालयांचे उद्घाटन करण्यात आले. शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीराज महाजन आणि डॉ. सुभा महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.










