• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत कार्यशाळेत झाले विचारमंथन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 13, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

जळगाव, (प्रतिनिधी) : पावसाच्या पाण्याचे संकलन, जलसाठ्यांची निर्मिती आणि जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामांतून जल व्यवस्थापनाचा वस्तुपाठ अनुभवण्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत आयोजित महाराष्ट्र नदी संवर्धन कार्यशाळेतील सहभागी सदस्यांनी सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी जैन हिल्स येथील विविध जलसंधारण प्रकल्पांना भेट दिली. श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कामांची पाहणी करताना श्रद्धाधाम, भाऊंची सृष्टी, जैन इरिगेशनने दुरुस्ती केलेला जिल्हा परिषदेचा तलाव अशा विविध ठिकाणच्या कामांची माहिती घेण्यात आली. जलसंधारणाच्या या प्रत्यक्ष अनुभवासोबतच नदी संवर्धन, लोकसहभाग आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवरही कार्यशाळेत मंथन झाले.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कामांची माहिती क्षेत्रभेटीत घेण्याचे आवाहन जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी आपल्या उद्घाटन भाषणात केले होते. त्यानुसार आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रथम श्रद्धाधाम येथे भेट देण्यात आली. जैन हिल्सपरिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे एकत्रीकरण करून श्रद्धाधाम येथे मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्यासाठी विकसित केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर भाऊंची सृष्टी डोंगर माथा परिसरातील सुमारे दोन कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेच्या जलाशयाचीही माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील तलावाची पाहणी करण्यात आली. हा तलाव जैन इरिगेशनच्या अखत्यारीत नसला तरी त्याच्या दुरुस्तीचे काम कंपनीने केले आहे. या प्रकल्पांची माहिती जैन इरिगेशनचे सहकारी पी. ए. पाटील तसेच पीआरओ गिरीश कुळकर्णी यांनी उपस्थितांना दिली.

क्षेत्रभेटीनंतर झालेल्या सत्राचे प्रास्ताविक अंकुश नारायणकर यांनी केले. जलबिरादरी महाराष्ट्राचे अध्यक्ष नरेंद्र चूघ यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. त्यात जयाजी पाईकराव, एच.पी. देशमुख, एकनाथ माळतकर, मनोहर हेपाट, सविता राजपूत, आरती पाटील यांनी सहभाग घेतला. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या विषयाचे उदाहरण घेऊन नदीविषयक कामांची माहिती दिली, तर मुरलीधर बेलखोडे यांनी सूक्ष्म पाणलोट क्षेत्रनिहाय नियोजन आणि नद्यांचे महत्त्व स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालये आणि एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याची गरज अधोरेखित केली. सविता राजपूत यांनी नदी संवर्धनासाठी लोकचळवळीचे महत्त्व सांगितले. आरती पाटील यांनी नदी-नाले, ओढे, वृक्षसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापनावर विचार मांडले. नदी संवर्धनाची जबाबदारी, प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, उगमापासून संगमापर्यंतचे नियोजन, किमान तीन ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची आवश्यकता आणि केटी वेअर व बंधाऱ्यांच्या उभारणीत जैवविविधतेचा विचार या मुद्द्यांवर चर्चा झाली. विजय चिमणकर यांनी ‘ग्रीन सर्जन’ ही संकल्पना मांडून युवकांना या कामांमध्ये आकृष्ट करून त्यांना ग्रीन सर्जन संबोधावे असे विचार मांडले.

नद्यांची अवस्था वाईट झालेली आहे. काही तरी चुकले आहेत काही नद्या प्रदूषित पाणी घेऊन वाहत आहेत तर काही नद्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा निहाय समिती तयार करून त्यावर विशेष कामगिरी करण्यात यावी अशी महत्त्वाची सूचना चर्चासत्राचे अध्यक्ष नरेंद्र चूघ मांडली. त्याच प्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात शिवाजी नाना पाटील, गोविंद जामदार, डॉ. हनुमंत साळुंखे, विलास साबळे, जयाजी पाईकराव, नरेंद्र चुघ, अभिजित शितोळे, चंद्रकांत उत्तेकर, गोकुळ सुरासे तसेच ईश्वर पाटील, विजय चिमणकर, प्रकाश अर्जुनकर, सुनील रहाणे, विशाल सोमकुल, प्रमोद सरदार आणि चुन्निलाल ब्राह्मणे यांनी आपले विचार व्यक्त केले. नदी संवर्धनासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय, स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग आणि शास्त्रीय पद्धतीने जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याची गरज या चर्चासत्रांतून अधोरेखित झाली.

*कार्यशाळेचा १३ ऑक्टोबर रोजी समारोप*

या कार्यशाळेचा समारोप १३ ऑक्टोबर रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह तसेच जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्या उपस्थितीत होणार आहे. राजस्थानच्या दुष्काळग्रस्त भागात गावकऱ्यांसोबत मिळून काम करण्यास राजेंद्र सिंह यांनी सुरुवात केली. त्यांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी पारंपरिक ‘जोहड’ (पाणी साठवण्याचे मातीचे छोटे बंधारे) पुन्हा जीवंत केले आणि हजारो जलसंधारण संरचना उभारल्या त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना मिळणार आहे.

 


 

Next Post
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

ताज्या बातम्या

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add