• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

शाळा-अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाच्या नियोजनाला मान्यता; लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करून अत्यावश्यक कामे निश्चित करावीत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा, राजकीय
0
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

जळगाव, (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शाळा व अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून देत पक्क्या इमारती, वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि आवश्यक मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यात आदर्श शाळा व अंगणवाड्या उभारण्यासाठी प्रमाणित आराखडे (टाईप प्लॅन) तयार करून कामांचे नियोजन करावे. तसेच लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन अत्यावश्यक कामे निश्चित करावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.*
जिल्हाधिकारी कार्यालयात, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाच्या व्यापक नियोजनाला मान्यता देण्यात आली.

बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर पाटील, सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता मनोज पाटील उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकुमार महाजन,मंगेश चव्हाण, अमोल जावळे, चंद्रकांत सोनवणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

*पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश; मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य*
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या हा ग्रामीण शिक्षणव्यवस्थेचा पाया आहे. ग्रामीण भागातील मुलांना सुरक्षित इमारती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील शाळा आणि अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुविधांची पाहणी करावी. गरजेनुसार कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव तयार करावेत. जनसुविधे अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

*प्रमाणित आराखड्यांना मान्यता;* नियोजनबद्ध आधुनिकीकरणाचा निर्णय

बैठकीत,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले. शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांची दुरुस्ती, आवश्यकतेनुसार नवीन बांधकामे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अंगणवाड्यांमधील मूलभूत सुविधांसाठी प्रमाणित आराखडे तयार करण्यावर भर देण्यात आला. कामांच्या दर्जात एकसमानता, निधीचा प्रभावी वापर आणि अंमलबजावणीत सुसूत्रता राहावी, या दृष्टीने व्यापक नियोजनाला बैठकीत मान्यता देण्यात आली.

सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अधिक पाणी लागणारी बांधकामे टाळून अत्यावश्यक सुविधांची कामे प्राधान्याने हाती घेण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

*शाळा-अंगणवाड्यांच्या विकासाचा ‘जळगाव पॅटर्न’ व्हावा*
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शाळा व अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ग्रामीण शैक्षणिक सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला. आमदार किशोर पाटील यांनी हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणारा ‘जळगाव पॅटर्न’ म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार मंगेश चव्हाण यांनीही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामीण शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, आदर्श शाळा व अंगणवाड्यांच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्नांना गती मिळणार आहे.
*************

Next Post
मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add