• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी : थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनकार्यावर आधारित कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शन जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख व डॉ. एस. एस. राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा परिचय खान्देशातील जनतेला आणि विद्यार्थी वर्गाला व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या तीन दिवसीय जीवनदर्शन प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था, सातारा येथील कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यकारी संचालक कमलाकर महामुनी तसेच जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे मानद सचिव श्री. निलेश भोईटे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांचा आणि समाजपरिवर्तनाच्या महान कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगावची स्थापना झाली. समितीच्या २५ वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा समाजासमोर मांडणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

हे प्रदर्शन दिनांक १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कर्मवीरांच्या समग्र जीवनप्रवासावर साकारण्यात आलेली भव्य महारांगोळी तसेच त्यांच्या जीवनकार्यावरील दुर्मिळ छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींचे (व्हिडिओ) विशेष सादरीकरण असणार आहे.

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित या ऐतिहासिक व प्रेरणादायी प्रदर्शनाचा लाभ जळगाव शहर व परिसरातील सर्व नागरिक, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य एल. पी. देशमुख व डॉ. एस. एस. राणे तसेच आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

Next Post
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

शाळा - अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add