• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

जैन हिल्स ला ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान कार्यशाळाला सुरवात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

जैन हिल्स ला ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियान कार्यशाळाला सुरवात

जळगाव दि. ११ प्रतिनिधी जेव्हा नदी प्रवाहीत होत असते तेव्हा ती समानतेला सोबत घेऊन येते. देशाचा विकास हा सनातन म्हणजे सदैव नित्य नुतन असावा यामध्ये नद्यांना उजाड, विनाश करणारा नसावा नदीला प्रदुषण, अतिक्रमण, पाण्याचे शोषणापासून मुक्त केले पाहिजे. यासाठी संत, समाज, प्रशासन, संस्था यांच्या माध्यमातून लोकसहभागातून कार्य वाढले पाहिजे. कारण नदीच्या आजूबाजूला शुद्ध हवा, जैववैविधता वाढल्याने जमिनीची धूप थांबत असल्याचे जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

जैन हिल्स येथे सुरू झालेल्या ‘चला जाणूया नदीला’ महाराष्ट्र नदी संवर्धन अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र सिंह बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशन कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन उपस्थित होते. त्यांच्यासमवेत जलबिरादरीचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यनारायण बोल्लीसेटी, नरेंद्र चुघ, उज्ज्वलकुमार चव्हाण, शेखर निंबाळकर, गोपाळ पाटील, सतिश गोगुलवार आदी मान्यवर होते. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये दि. ११ ते १३ दरम्यान होणाऱ्या या कार्यशाळेत संपूर्ण महाराष्ट्रातून नदी प्रहरी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या शास्त्रोक्त पद्धतीने अहवाल तयार करुन त्यावर पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे. शासन प्रशासन, समाज यांच्या एकत्रित प्रयत्नातून या नद्यांचे ‘उगम ते संगमा’ दरम्यान करायवयाच्या उपाय योजनांवर कृतिशील आरखडा तयार असल्याचे प्रास्ताविकामध्ये नरेंद्र चुघ यांनी सांगितले. नदीला असलेल्या उपनद्या, नाले, ओढे, तलाव यांना प्रदुषण मुक्त ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, नदीला नाल्या बनवू नये मात्र नाल्याला नदीमध्ये परावर्तित करण्याचे पवित्र कार्य झाले पाहिजे असे ते म्हणाले.

नदी सोबत आपले पणाचा व्यवहार केला पाहिजे असे सांगत पाण्याचे संवर्धन करण्याच सल्ला अजित जैन यांनी दिला. पाण्याच्या प्रत्येक थेंबात ऊर्जा आहे. तिचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. कमीत कमी पाण्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बाष्पीभवनामुळे वाया जाणारे पाणी ह्याचाही विचार झाला पाहिजे. यासाठी ‘रिर्साेस टू रूट’ ही संकल्पना जैन इरिगेनने आणली. पाण्याच्या स्त्रोतापासून ते पिकांच्या मूळांपर्यंत पाणी हे कार्यक्षमतेने पोहचले पाहिजे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंवर्धन, मृदासंवर्धनासोबतच पाण्याला सांभाळून ठेवता येईल. यासाठी जंगल, नाले, ओढे यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. नदी प्रदुषित झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा ते होण्याच्या आधीच उपाय योजना केल्या तर नदीचे संवर्धन खऱ्या अर्थाने होईल, त्यासाठी सांडपाण्याचा पुर्नवापर केला पाहिजे असे मनोगत अजित जैन यांनी व्यक्त केले.
उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी पाच पाटील ही संकल्पना नदी प्रहरींना समजून सांगितली. मान्यवरांच्या हस्ते गिरणा नदीवरील अहवाल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महात्मा गांधी यांच्या श्रमदान संकल्पनेतून माथा ते पायथा जलसंधारणाची कामे केली पाहिजे. चला जाणू या नदीला या उपक्रमासाठी प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल. यासाठी जिल्ह्यात त्यांनी तापी जलपुर्नभरण, गिरणा नदीवरील बंधारे, भागपूर व बोदवड उपसा सिंचन, वाघुर प्रकल्प तसेच शेततळ्यांची सविस्तर माहिती दिली. कृती संगमातून योजनांना मूर्त स्वरूप देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जल बिरादरीचे अंकूश नारायणकर यांनी संचालन केले

Next Post
सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव
गुन्हे

सेवा संकल्प अभियानांतर्गत बालकलावंतांचा पालकांसह गौरव

October 12, 2026
सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

सनातन विकासाठी नदी संवर्धन महत्त्वाचे – डॉ. राजेंद्र सिंह

October 12, 2026
वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add