• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 12, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

जळगाव, (प्रतिनिधी) : वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार बाळासाहेब चव्हाण (बोरखेडेकर, ह.मु. जळगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय श्रीराम पाटील (दगडीकर) तर जिल्हा सचिवपदी सुनील रतिलाल पाटील (विटनेरकर) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर, ह.मु. आळंदी) यांची वीर गुर्जर सेनेच्या आध्यात्मिक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पद्मालय शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे झालेल्या वीर गुर्जर सेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून संघटनेचा विस्तार आणि समाजबांधवांच्या तक्रारींचे निवारण करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर) होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर समाजातील कौटुंबिक प्रश्न, बदलती सामाजिक परिस्थिती आणि कुटुंबातील नातेसंबंध यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

लग्नानंतर मुलाच्या वागणुकीत बदल झाल्याची तक्रार अनेक कुटुंबांतून ऐकायला मिळते. मात्र, त्यामागील कारणांचा विचार न करता सुनेला दोष देण्याची प्रवृत्ती योग्य नसल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. आई-वडिलांनी मुलगा आणि सुनेला समजून घेऊन कौटुंबिक प्रश्न संवादातून सोडविण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. विवाहानंतर होणारे मतभेद आणि विभक्त होण्याच्या वाढत्या घटनांबाबतही चर्चा झाली. यामध्ये मोबाईलच्या अतिवापरासह बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या परिणामांवर विचारमंथन करण्यात आले.

समाजबांधवांच्या विविध तक्रारींचा पाठपुरावा करून त्यांचे निवारण करण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच वीर गुर्जर सेनेचे कार्य जिल्हा, तालुका, शहर आणि गावागावांत पोहोचवून संघटना अधिक व्यापक करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी डॉ. एल. डी. चौधरी (निमकर), हरिभाऊ गुर्जर (वढोदेकर), वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र पाटील (गाढोदेकर), प्रफुल्ल नाना पाटील (वडनगरीकर), ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (मनवेलकर), तुषार चव्हाण (बोरखेडेकर), अजय गुर्जर (झुरखेडेकर), विजय पाटील (दगडीकर) आणि सुनील पाटील (विटनेरकर) यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रफुल्ल नाना पाटील यांनी केले, तर आभार मंगल बी. पाटील यांनी मानले. बैठकीला समाजातील असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार
जळगाव जिल्हा

वीर गुर्जर सेनेची कार्यकारिणी जाहीर; कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्याय निवाडा मंडळ’ स्थापन होणार

October 12, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
खान्देश

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add