• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब होय! -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जयंती निमित्त पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला आठवणींना उजाळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 23, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब होय! -पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव, दि. २३ – हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार प्रमाण मानून मी आयुष्यात वाटचाल केली आहे. एक नेता, एक पक्ष आणि एक विचार अशी शिकवण देणारा शिवसेना हा जगातील एकमेव राजकीय पक्ष असून विचार, निष्ठा आणि सेवेचे चालते-बोलते विद्यापीठ म्हणजे बाळासाहेब ठाकरे होत. त्यांनी दिलेल्या बाळकडूमुळेच आज आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते हे मंत्री बनले असून शिवसेना हा पक्ष वटवृक्षासमान बहरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ना. पाटील यांनी आठवणींना उजाळा दिला. तर, साहेबांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या मूलमंत्रानुसार आपण आगामी काळात देखील वाटचाल करत राहू अशी ग्वाही देखील दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात पाळधी येथे स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या जि.प. निधीतून पाळधीकरांसाठी इलेक्ट्रीक घंटागाडीचे लोकार्पण देखील करण्यात आले. सदर घंटागाडी ही इलेक्ट्रीकवर चालणारी असल्याने यातून पर्यावरण संवर्धन साधले जाणार आहे.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेनेचे युवा जिल्हाधिकारी शिवराज पाटील, शिवसेनेचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, युवासेनेचे सहसचिव विराज कावडीया, पाळधी खु सरपंच शरद कोळी, पाळधी बु सरपंच प्रकाशनाना पाटील, परिसरातील सरपंच नाना सोनवणे, भागवत पाटील, प्रशांत पाटील, उपसरपंच चंदन कळमकर, उद्योगपती दिलीप बापू पाटील, चंदू माळी, पप्पू माळी, दिगंबर माळी, सागर शिरोळे, अकबर खान, शरद देशपांडे, पप्पू शिंदे, पिंटू कोळी, धम्मा कुंभार, अरविंद मानकरी, दिपक साबळे, प्रशांत पाटील, अरुण पाटील, मच्छिंद्र साळुंखे, सुरेश पाटील, अमोल पाटील, स्वप्नील परदेशी, कृष्णा साळुंखे माजी जिल्हा परिषद सदस्य, अनिल पंडित, दिनकर पाटील, हाजी सुलतान, अमर सेठ, संजय देशमुख, संजू महाराज, उदय झंवर, दीपक भदाणे, बंडू पाटील, आबा माळी, भरत पाटील, संजय देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Next Post
सर्जनशील कार्यक्रमांची निर्मिती हे परिवर्तनचे वैशिष्ट्ये – मान्यवरांचे मत

सर्जनशील कार्यक्रमांची निर्मिती हे परिवर्तनचे वैशिष्ट्ये - मान्यवरांचे मत

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group