• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2026
in गुन्हे
0
शेतात अश्लील चाळे करणाऱ्यांचा पर्दाफाश, राजस्थानच्या १० महिलांसह २३ जण ताब्यात

​मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडसगाव-चिखली शिवारात बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हॉटेल्समागील शेतात अश्लील चाळे सुरू असल्याच्या प्रकाराचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. बुधवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात १३ पुरुष आणि १० महिला अशा एकूण २३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, घोडसगाव-चिखली शिवारातील हॉटेलच्या मागील शेतात काही पुरुष आणि महिला अश्लील कृत्य करत अवैध कृत्य चालत असल्याची गोपनीय बातमी एलसीबीला मिळाली होती. या माहितीची तात्काळ दखल घेत पथकाने रात्रीच्या वेळी घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांचा छापा पडताच परिसरात मोठी खळबळ उडाली. या कारवाईदरम्यान १० महिला आणि १३ पुरुषांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांची चौकशी केली असता ताब्यात घेतलेल्या सर्व १० महिला या राजस्थान राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​सीमावर्ती भागाचा फायदा घेत शेतात लपून छपून चालवल्या जाणाऱ्या या अवैध व्यवसायावर एलसीबीने केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर कामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणातील सर्व संशयितांवर कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरूपोर्णिमा साजरी

ताज्या बातम्या

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष
जळगाव जिल्हा

मनपाच्या मानाच्या गणपतीची आगमन मिरवणूक; पारंपरिक वेशभूषेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा जल्लोष

September 14, 2026
विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज
जळगाव जिल्हा

विघ्नहर्त्याचे आज आगमन; जळगावात २,९९० गणेश मंडळे बाप्पाच्या स्वागताला सज्ज

September 14, 2026
‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला
खान्देश

‘मुलगा मानलेल्या’ भाच्याचाच घातक कट; ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून मृतदेह लपवला

September 13, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 
जळगाव जिल्हा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा-महापौर दीपमाला मनोज काळे 

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
खान्देश

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026
टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत; गोदावरी अभियांत्रिकीत सहा दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add