• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

गोदावरी स्कूलमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी 'पॉश अ‍ॅक्ट' कार्यशाळा उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

जळगाव, (प्रतिनिधी) : कार्यस्थळी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६—२७ अंतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ ( पॉश अ‍ॅक्ट २०१३)” या विषयावर ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे यांनी पॉश अ‍ॅक्ट कायद्याची आवश्यकता, उद्दिष्टे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संस्थेने संवेदनशील वातावरण निर्माण करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकीदेखील असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी कर्मचारी हक्क व जबाबदार्‍या, लैंगिक छळाची व्याख्या व त्याचे विविध प्रकार, अंतर्गत तक्रार समिती (अंतर्गत तक्रार समिती — आयसीसी) ची रचना, कार्यपद्धती तसेच तक्रार दाखल करण्याची आणि तिच्या निवारणाची प्रक्रिया याबाबत उदाहरणांसह माहिती दिली. कोणत्याही प्रकारचा लैंगिक छळ सहन न करता योग्य माध्यमातून तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. संवादात्मक स्वरूपात झालेल्या या सत्रामुळे उपस्थितांना पॉश कायद्याबाबत अधिक स्पष्टता मिळाली तसेच कार्यस्थळी परस्पर सन्मान, समानता आणि सुरक्षिततेची जाणीव अधिक दृढ झाली.

या ओरिएंटेशन कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.सुरक्षित, संवेदनशील आणि सन्मानजनक कार्यसंस्कृती घडविण्याच्या दिशेने हा ओरिएंटेशन कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Next Post
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

'माझे शहर माझी जबाबदारी' अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add