• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून यशस्वी उपचार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 16, 2026
in आरोग्य
0
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

जळगाव, (प्रतिनिधी) : सतत डोकेदुखीचा त्रास आणि नाक व कानातून सतत पाण्यासारखा द्रव बाहेर येत असल्याने त्रस्त असलेल्या एका तरूणीवर नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले आहे. तपासणीअंती संबंधित तरुणाला सीएसएफ ओटोरिया विथ रायनोरिया हा दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे मेंदूभोवती असलेले पाणी नाक व कानावाटे बाहेर वाहत होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हा त्रास पूर्णपणे थांबला असून रुग्णाची प्रकृती आता उत्तम आहे.

३५ वर्षीय तरूणीला अनेक महिन्यांपासून डोकेदुखी, नाकातून सतत पाणी येणे तसेच कानातूनही द्रवस्त्राव होण्याचा त्रास होत होता. सुरुवातीला हा साधा सर्दी किंवा कानाचा संसर्ग असल्याचे समजून विविध ठिकाणी उपचार घेण्यात आले. मात्र अपेक्षित फायदा झाला नाही. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नाक-कान-घसा विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी तरूणीच्या आजाराशी संबंधित आवश्यक तपासण्या केल्या.

विशेष तपासण्यांमध्ये मेंदूभोवतीचे सीएसएफ नाक आणि कानामार्गे गळत असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी रुग्णाला सीएसएफ ओटोरिया रिपेअर ही अत्यंत नाजूक व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतील पाणी गळती होणारे छिद्र शोधून ते विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून रुग्णाच्या नाक आणि कानातून होणारा द्रवस्त्राव पूर्णपणे थांबला आहे. त्याचबरोबर सतत होणार्‍या डोकेदुखीपासूनही त्याची सुटका झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकज शर्मा, डॉ. शुभम सावकर, डॉ. अंकीता सोलंकी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली.

◾नाक किंवा कानातून सतत पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येत असेल, विशेषतः डोक्याला दुखापत झाल्यानंतर किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे मेंदूतील सीएसएफ गळतीचे लक्षण असू शकते. वेळेत निदान आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारास विलंब झाल्यास मेंदूला संसर्ग होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
– डॉ. अनुश्री अग्रवाल
विभागप्रमुख, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

ताज्या बातम्या

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय
जळगाव जिल्हा

रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद राहणार; ‘खानदेश कॅटरिंग असोसिएशन’चा मोठा निर्णय

July 15, 2026
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप
जळगाव जिल्हा

गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात समारोप

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add