• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 6, 2026
in शैक्षणिक
0
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जळगाव, (जिमका) : तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत ‘स्माईल (SMILE)’ योजनेअंतर्गत विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रतिवर्ष १३,५०० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

या योजनेचा लाभ प्री-मॅट्रिक म्हणजे इयत्ता ९ वी व १० वी तसेच पोस्ट-मॅट्रिक म्हणजे इयत्ता ११ वी, १२ वी, महाविद्यालयीन शिक्षण आणि पोस्ट-ग्रॅज्युएशन करणाऱ्या पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनमान्य किंवा खासगी शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठात नियमित शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असून, अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवरून जारी करण्यात आलेले अधिकृत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी जागांची संख्या मर्यादित असल्याने लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील मेरिटच्या आधारे करण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटी (DBT) द्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने अर्जदाराचे बँक खाते आधार-लिंक असणे आवश्यक आहे.

पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी केले आहे.

Tags: #aducetion
Next Post
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

'एटोपिक प्रेग्नन्सी'मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

ताज्या बातम्या

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत
शैक्षणिक

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर
आरोग्य

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 6, 2026
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड
जळगाव जिल्हा

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

July 6, 2026
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 5, 2026
डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन
Uncategorized

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group