• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या बालशल्यचिकित्सा व बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांची इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स अंतर्गत कार्यरत सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमूळे मानाचा तुरा खोवला गेला.

सोसायटी ऑफ पेडिएट्रिक युरोलॉजी ही देशातील लहान मुलांच्या मूत्र रोग संबंधी शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांची देशातील सर्वात अग्रणी संस्था आहे. त्यांच्या या निवडीमुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्रात दीर्घकाळापासून विशेषतः लहान मुलांमधील मुतखड्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि मूत्ररोग विकार यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या डॉ. जोशी यांनी आपल्या ज्ञान, अनुभव, संशोधनवृत्ती आणि उत्कृष्ट रुग्णसेवेच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. जोशी यांनी लहान मुलांमधील मुतखड्यांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ह्या देश अँड विदेशातही यशस्वी रित्या केलेल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉ. जोशी यांच्या निवडीमुळे बाल मूत्ररोग उपचार, संशोधन, वैद्यकीय शिक्षण तसेच आधुनिक उपचार पद्धतींच्या प्रसाराला अधिक गती मिळणार असून, देशभरातील बालरुग्णांना त्याचा लाभ होणार आहे.

या निवडीबद्दल गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांचेसह विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. मिलिंद जोशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या समर्पित सेवाभाव, नेतृत्वगुण आणि वैद्यकीय उत्कृष्टतेमुळे बाल मूत्ररोग शस्त्रक्रिया क्षेत्र अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Next Post
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

ताज्या बातम्या

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत
शैक्षणिक

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

July 6, 2026
महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर
आरोग्य

महादेव हॉस्पिटलतर्फे पाठीच्या कण्यावरील आजारांवर शिबिर

July 6, 2026
डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड
जळगाव जिल्हा

डॉ. मिलिंद जोशी यांची ’सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी’च्या चेअरमनपदी निवड

July 6, 2026
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 5, 2026
डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन
Uncategorized

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 5, 2026
माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक
जळगाव जिल्हा

माजी आमदार राजाराम महाजन यांच्याकडून ‘महादेव हॉस्पिटल’च्या कार्याचे कौतुक

July 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group