• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 5, 2026
in Uncategorized
0
डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभागातर्फे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त २ जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. पंकज शर्मा, डॉ. विपुल त्रिआहार आणि डॉ. सचिन डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी डॉ. हॅनेमन यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांशी निष्ठावान राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. पंकज शर्मा यांनी आधुनिक वैद्यकीय सरावामध्ये हॅनेमन यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विपुल त्रिआहार यांनी विद्यार्थ्यांना निरंतर अध्ययन, संशोधनवृत्ती आणि नैतिक वैद्यकीय सेवा यासाठी प्रेरित केले. तर डॉ. सचिन डी. पाटील यांनी रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमात प्रथम वर्षाचा बीएचएमएस विद्यार्थी राहुल गाडगे याने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत डॉ. हॅनेमन यांचा वैद्यकीय वारसा जतन व वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर डॉ. प्रतीक डी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ’हॅनेमिनियन शपथ’ दिली.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएचएमएसच्या सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय विभागाच्या वतीने करण्यात आले, तर भूषण वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


 

Next Post
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add