• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 5, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

जळगाव, (प्रतिनिधी) : ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या उपक्रमाच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योजक घडविण्याचे कार्य गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या कालावधीत देशभरातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आधुनिक शेती, कृषी व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेतले आहे.

जैन इरिगेशनसह विविध सहकारी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आगामी काळात भारतीय कृषी क्षेत्रात सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडून येतील, असा विश्वास जैन फार्म फ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी जैन हिल्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी फालीच्या उपाध्यक्ष नॅन्सी बेरी, गुड अँड ग्रीन सस्टेनेबिलिटी अँड सीएसआर, गोदरेजच्या पाकज्ञान दस्तूर, फालीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शार्बोनी पोदार तसेच जनरल मॅनेजर रोहिणी घाडगे उपस्थित होत्या. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. अथांग जैन म्हणाले की, बदलत्या कृषी परिस्थितीत तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचे ज्ञान तसेच शाश्वत शेतीच्या पद्धतींचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, नवोन्मेषी विचारसरणी आणि कृषी उद्योजकतेची जाणीव विकसित होत आहे. यामुळे भविष्यात सक्षम कृषी नेतृत्व निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल.

फाली कार्यक्रमाचा विस्तार आता तीन राज्यांमध्ये करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातून तयार होणारे युवा कृषी नेते आधुनिक, शाश्वत शेती आणि उद्योगाच्या दिशेने देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमास जैन इरिगेशन सह गोदरेज ॲग्रोवेट, युपीएल, स्टार ॲग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add