• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात तज्ञांची यशस्वी कामगीरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 5, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

जळगाव, (प्रतिनिधी) : टायफॉईडच्या गंभीर संसर्गामुळे आतड्याला छिद्र (इंटेस्टायनल परफोरेशन) झालेल्या ३५ वर्षीय रुग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्णाला ताप, तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि उलट्या यांचा त्रास होत होता. तपासणीनंतर टायफॉईडमुळे लहान आतड्याला छिद्र पडल्याचे निदान झाले. ही अत्यंत गंभीर व जीवघेणी परिस्थिती असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यचिकित्सा विभागाचे शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णावर एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी व आयलिओस्टॉमी ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेत त्यांना ज्युनिअर रेसिडेंट डॉ. अपूर्वा गवई व डॉ. प्रणव शेवाळे यांनी सहकार्य केले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून विशेष वैद्यकीय देखरेखीखाली उपचार देण्यात आले. भूलरोग तज्ज्ञ डॉ. शीतल ढाके यांनी शस्त्रक्रियेदरम्यान तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावली. डॉक्टर, नर्सिंग कर्मचारी आणि आरोग्यसेवकांच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. दहा दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले.

वेळेवर निदान, तातडीची शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा यामुळे रुग्णाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून जटिल शस्त्रक्रियांमध्येही यशस्वी उपचार केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

▪️टायफॉईडचा संसर्ग वेळेवर नियंत्रणात न आल्यास आतड्याला छिद्र पडण्याची गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. संबंधित रुग्णाला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर तातडीने एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी व आयलिओस्टॉमी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर अतिदक्षता विभागात विशेष उपचार करण्यात आले. योग्य वेळी निदान, तातडीचे शस्त्रक्रियात्मक उपचार आणि संपूर्ण वैद्यकीय टीमच्या प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती चांगली सुधारली असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप, पोटदुखी किंवा टायफॉईडची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. चैतन्य पाटील, शल्यचिकित्सक.


 

Next Post
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add