• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 4, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

जळगाव, (प्रतिनिधी) : स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल आणि जीटीटी फॉउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत दोन दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

१ व २ जून २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमाला प्राचार्य विशाखा गणविर, प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॉर्पोरेट ट्रेनर व लीडरशिप कोच अक्षय भालेराव इ मान्यवरासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थीत होते. अक्षय भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संवाद कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी, संघभावना, व्यावसायिक शिष्टाचार तसेच सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना आधुनिक व्यावसायिक जगातील आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली. कार्यक्रमात आकर्षक सादरीकरणे, प्रात्यक्षिक उपक्रम, गटचर्चा, भूमिकानाट्य रोल प्ले तसेच विविध कौशल्यवर्धक कृतींचा समावेश करण्यात आला होता.

सहभागी विद्यार्थ्यांनी सत्रे अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या प्रशिक्षणातून मिळालेली व्यावहारिक कौशल्ये त्यांच्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच भविष्यातील व्यावसायिक जीवनातही उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, स्टुडंट्स सपोर्ट अँड प्रोग्रेशन सेल तसेच जीटीटी फॉउंडेशन यांनी सहकार्य केले. समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मिळालेली कौशल्ये वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी प्रभावीपणे वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.

Next Post
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन - अनिल जैन

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add