• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

तिघांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 4, 2026
in गुन्हे
0
मैत्रिणीने पाशवी जाळ्यात ओढले; तरुणीवर अमली पदार्थ पाजून अत्याचार

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात निर्मल दिनेश तिवारी (रा. प्रजापती नगर), जय चौधरी (रा. शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण एकाच शाळेत शिकत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये मैत्रिणीने पीडितेला पहिल्यांदा सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील गावाला गेलेले असताना, मैत्रिणीने तिला आरोपी निर्मल तिवारी याच्यासोबत कारमधून नेले. तिथे तिला सिगारेट, दारू व गांजाचे व्यसन लावण्यात आले. याच दरम्यान निर्मलने मोहाडी रोडवरील ट्रॅकवर कारमध्ये पीडितेला दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार करत होता. इतकेच नव्हे तर, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मलने तिला धमकी देऊन घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत स्वतःच्या घरी डांबून ठेवले.

​पीडितेने निर्मलच्या घरी पुन्हा जाण्यास नकार दिला असता, २७ मे २०२६ रोजी निर्मलचा मित्र गौरव पुरोहित याने तिला स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. तसेच जय चौधरी नावाच्या तरुणाने पीडितेच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन ते तीन वेळा ड्रग्ज आणून दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने वडिलांसह ३ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, पोलीस या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tags: #jalgaon_cityCrimePolice
Next Post
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add