• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

​महसूल बुडाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार – उपमहापौर मनोज चौधरी

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहरात अनेक नवीन घरे बांधून पूर्ण झाली असून ती वापरातही आली आहेत, मात्र अद्याप त्यावर घरपट्टी आकारणी झालेली नाही. यामुळे जळगाव महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याबद्दल उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, २१ मे (गुरुवार) रोजी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनात जळगाव महानगरपालिकेची संयुक्त आढावा बैठक पार पडली.

​या बैठकीला उपायुक्त शिंदे मॅडम, हाऊस टॅक्स (घरपट्टी) विभागीय अधिकारी, प्रभाग अधिकारी, टी.पी. (नगररचना) अधिकारी तसेच नवीन घर मॅपिंग संबंधित कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

​मॅपिंग एजन्सीच्या कामावर ताशेरे..
​बैठकीदरम्यान उपमहापौर मनोज चौधरी यांनी घर मॅपिंगच्या कामावर अत्यंत कडक शब्दांत आक्षेप घेतला. शहरात घर मॅपिंग करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत करोडो रुपयांची एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे, मात्र या संबंधित मॅपिंग कंट्रोल कॉन्ट्रॅक्टरकडून अपेक्षित दर्जाचे आणि प्रभावी काम होत नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील अनेक नवीन बांधकामांची माहिती अद्याप नोंदवली गेलेली नसल्यामुळेच मनपाचा महसूल बुडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​समन्वय वाढवण्याचे व तातडीने सर्वेक्षणाचे निर्देश..
​शहरातील नव्याने उभ्या राहिलेल्या अशा सर्व मालमत्तांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांची घरपट्टी नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. महसूल वाढीसाठी मॅपिंग विभाग, बांधकाम परवानगी विभाग आणि घरपट्टी विभाग यांच्यात समन्वय वाढवून एक प्रभावी यंत्रणा उभी करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

​हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा..
​उपमहापौर चौधरी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद दिली की, संबंधित एजन्सीकडून जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करून घेण्यात यावे. प्रत्येक नवीन बांधकामाची अचूक माहिती संकलित करून त्यावर तत्काळ घरपट्टी आकारणी झाली पाहिजे. या कामात यापुढे कोणताही हलगर्जीपणा किंवा दिरंगाई आढळल्यास थेट संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
​महानगरपालिकेच्या महसुलात वाढ होणे ही काळाची गरज असून, प्रशासनाने अधिक सक्षम, पारदर्शक आणि जबाबदारीने काम करावे, असे आवाहनही उपमहापौर मनोज चौधरी यांनी शेवटी केले.


 

Next Post
विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

विद्यार्थिनीवर अत्याचार; भावाला मारण्याची धमकी देत केला प्रकार

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add