• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 22, 2026
in शैक्षणिक
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचा बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली.

या परीक्षेत पायल चंद्रिकापूरे हिने ७६.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गौरी प्रवीण धावले व संस्कृती राहुल पुनवतकर यांनी ७४.८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अक्षदा अरविंद गावित, मयुरी दिनकर कोळी आणि शर्ली स्टिव्हेन्सन यांनी ७२.८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ऋषिकेश राजेश्वर गुंड यांनी ७१.२ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक, तर तृप्ती पुरुषोत्तम करंगळे हिने ७०.८ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्राचार्य विशाखा गणविर आणि प्राध्यापकवर्ग व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची यशस्वी परंपरा कायम राहिली आहे. या उल्लेखनीय निकालामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

Next Post
उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

उपमहापौरांचा कडक पवित्रा: नवीन घरांच्या मॅपिंग आणि घरपट्टी आकारणीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही!

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add