• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे यश, स्तनांची गाठ दुर्लक्षीत करू नका तज्ञांचा सल्ला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 21, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या एक वर्षापासून स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ५५ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या आरोग्याला नवे जीवन दिले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याच्या जोरावर ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

बर्‍हाणपूर येथील ५५ वर्षीय महिला गेल्या वर्षभरापासून डाव्या स्तनात गाठ जाणवत असल्याची तक्रार घेऊन त्रस्त होती. सुरुवातीला किरकोळ वेदना व सूज असल्यामुळे तिने दुर्लक्ष केले. मात्र कालांतराने गाठ वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने उपचारासाठी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकीत्सक डॉ. वैभव फरके, डॉ. पारितोष ठाकूर, डॉ. अपुर्वा गवई, डॉ. शुभम फावडे, डॉ. प्रज्योत कदम यांच्या टीमने महिलेची सविस्तर तपासणी केली. आजाराचे अचूक निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या रक्ततपासण्या, सोनोग्राफी तसेच एफएनएसी या तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या अहवालांच्या आधारे स्तनातील गाठ गंभीर स्वरूपाची असल्याचे निदान झाले.

यानंतर शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली महिलेवर ‘मोडीफाइड रॅडीकल मॅस्टेक्टोमी’ या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागातील अनुभवी डॉक्टरांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पाडली. ऑपरेशनदरम्यान स्तनातील गाठ तसेच आवश्यक ते ऊतक सुरक्षितपणे काढून टाकण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

▪️स्तनातील गाठीकडे महिलांनी कधीही दुर्लक्ष करू नये. सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले तर उपचार अधिक प्रभावी ठरतात. या रुग्णामध्ये विविध तपासण्यांद्वारे आजाराचे अचूक निदान करून ‘मोडीफाइड रॅडीकल मॅस्टेक्टोमी’ पद्धतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
– डॉ. शुभम फावडे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

ताज्या बातम्या

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 21, 2026
अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

अनुकूल अहवालासाठी दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधक बारीसह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!

May 20, 2026
‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव
जळगाव जिल्हा

‘विनोबा’तर्फे जिल्हास्तरीय ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कार सोहळा उत्साहात; गुणवंत शिक्षकांचा गौरव

May 20, 2026
NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन
जळगाव जिल्हा

NEET पेपरफुटी प्रकरण : जळगावात ‘महाविकास आघाडी’च्या युवक संघटना आक्रमक; एम. जे. कॉलेजसमोर आंदोलन

May 20, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान
Uncategorized

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; आचारसंहिता लागू, १८ जून रोजी मतदान

May 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

May 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group