• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

​जळगाव, (प्रतिनिधी) : सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भुसावळ येथे एका ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल ३१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याने मोबाईलवर एक अनोळखी ॲप डाऊनलोड केले होते. या ॲपच्या माध्यमातून त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत तिसऱ्या एका व्यक्तीने या दोघांचा अश्लील व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवून तुमची बदनामी करू, अशी धमकी संशयितांनी दिली.

बदनामीच्या धाकाने घाबरलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याकडून संशयितांनी वारंवार पैशांची मागणी केली. लोकलज्जेस्तव पीडित कर्मचाऱ्याने ऑनलाइन माध्यमातून एकूण ३१ हजार रुपये संशयितांच्या खात्यावर पाठवले. मात्र, तरीही पैशांची मागणी थांबत नसल्याने अखेर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

घडलेल्या या प्रकारानंतर, पीडित कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून, नागरिकांनी अनोळखी ॲप्स आणि सोशल मीडियावरील लोकांशी संवाद साधताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
​

Tags: #videoBhusawalCrimePolice
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या विचारांचा वारसा जोपासण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group