• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 7, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
प्रेमाचा तगादा ठरला जीवघेणा; तृतीयपंथीयाची हत्या करून मृतदेह जाळणारा संशयित जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्र फिरवत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. हा मृतदेह एका तृतीयपंथीयाचा असून, प्रेमसंबंधासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून पहूर येथील एका तरुणाने त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील ऊर्फ गोलू अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याला अटक केली आहे.

​ओळख पटवणे होते मोठे आव्हान..
​४ फेब्रुवारी रोजी पद्मालय वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मारेकऱ्याने मृतदेहाचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला होता. घटनास्थळी मोबाईल रेंज नसल्याने आणि मानवी वर्दळ नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून अंगावरील कपडेही काढून टाकण्यात आले होते.

​नेलपॉलिश आणि ‘मुर्नी’ने दिला तपासाला दिशा..
​जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि नाकातील सोन्याची ‘मुर्नी’ हे तपासातील महत्त्वाचे धागे ठरले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी अळ्यांच्या वाढीवरून मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारीला झाल्याचे स्पष्ट केले. या तांत्रिक आणि भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, हा मृतदेह आकांक्षा ऊर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे समोर आले.

​असा घडला गुन्हा..
​मयत आकांक्षा आणि संशयित स्वप्नील पाटील यांच्यात परिचय होता. आकांक्षा ही स्वप्नीलकडे प्रेमसंबंधासाठी सतत तगादा लावत होती, ज्यावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी स्वप्नीलने तिला पद्मालय येथे गणपती दर्शनाच्या बहाण्याने नेले. दर्शन झाल्यानंतर त्याने तिला जंगलात नेऊन तिच्या डोक्यात वार केले आणि ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याने तिचे कपडे काढून दुचाकीतील पेट्रोल ओतून मृतदेह जाळला.

​पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे स्वप्नीलला ताब्यात घेतले असून, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कारवाईत उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, ईश्वर पाटील आणि विनोद पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
​


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

विकसित भारत संकल्पनेत महाराष्ट्र ठरणार देशाच्या प्रगतीचे इंजिन; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मांडले अर्थसंकल्पाचे महत्त्व

ताज्या बातम्या

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार
खान्देश

पडदा पडला, पण नानांचा अभिनय कायम स्मरणात राहणार

October 8, 2026
सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता
जळगाव जिल्हा

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

October 7, 2026
एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
जळगाव जिल्हा

एस-३ ईव्हीएम मॉडेलमुळे मतदान प्रक्रिया अधिक गतिमान व सदोषरहित होणार -राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे

October 7, 2026
प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
खान्देश

प्रेमसंबंधाला विरोध केल्याने धमक्या; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

October 7, 2026
क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!
गुन्हे

क्षुल्लक वाद पेटला अन् गळ्यावर कटर फिरला!

October 7, 2026
नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add