• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभागात परिवर्तनाचा निर्धार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 12, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ चे उमेदवार ललितकुमार घोगले आणि १२ ‘ड’ चे उमेदवार सुरेश पोपट पवार यांच्या प्रचाराने रविवारी समता नगर परिसरात चांगलाच जोर धरला. काढण्यात आलेल्या भव्य प्रचार फेरीला महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या भागात घोगले आणि पवार यांचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

​सकाळी १० वाजता समता नगरमधून या प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता. ठिकठिकाणी महिलांनी घराबाहेर येत उमेदवारांना पेढे भरवून त्यांचे औक्षण केले आणि विजयाचा टिळा लावला. ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना पुष्पहार घालून विजयासाठी आशीर्वाद दिले. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने आणि नागरिकांच्या उत्साहाने प्रचारात मोठी रंगत आणली.

​ललितकुमार घोगले आणि सुरेश पवार यांनी यावेळी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “स्थानिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

​या प्रचार फेरीत राहुल सुरवाडे, भीमराव पवार, केतन पवार, जिगर अहिरे, प्रशांत सूर्यवंशी, सुमित परदेशी, अंकित मौर्य, अतुल पवार, सागर केदार, गजानन पाटील, प्रसाद महाजन, आरती घोगले, प्रेमा पेशट्टीवार, पवन घुसाळ, रफिक पिंजारी, मीना जाधव, गणेश जाधव, उमेश वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: #jalgaon_city#political
Next Post
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add