• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभाग १३ (ड) मध्ये महायुतीचे पारडे जड; प्रफुल्ल देवकरांना दोन अपक्ष उमेदवारांचा जाहीर पाठिंबा

आमदार राजूमामा भोळेंच्या उपस्थितीत दिले सहकार्याचे पत्र

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 9, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रभाग १३ (ड) मध्ये महायुतीचे पारडे जड; प्रफुल्ल देवकरांना दोन अपक्ष उमेदवारांचा जाहीर पाठिंबा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३ (ड) मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराला वेग आला असतानाच, आता या प्रभागातील दोन प्रमुख अपक्ष उमेदवारांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार मगन व्यंकट पाटील आणि अनिल रमेशचंद्र पगारिया यांनी प्रफुल्ल देवकर यांच्या विजयासाठी आपला पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीची स्थिती अधिक भक्कम झाली आहे.

​विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी एक पाऊल मागे.
भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १३ मध्ये गेल्या काही वर्षांत मोठी विकासकामे झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या सर्वांगीण विकासाचा जो संकल्प सोडला आहे, त्याला बळ देण्यासाठी दोन्ही अपक्ष उमेदवारांनी प्रफुल्ल देवकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मगन पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा जाहीर केला, तर अनिल पगारिया यांनी प्रभाग १३ च्या विकासासाठी देवकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे निश्चित केले.

​आमदार राजूमामा भोळेंच्या हस्ते समर्थन पत्र..
या दोन्ही उमेदवारांनी प्रफुल्ल देवकर यांच्या समर्थनाचे पत्र आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल देवकर म्हणाले की, “मिळत असलेला हा पाठिंबा म्हणजे मतदारांचा महायुतीवरील विश्वास आहे. आगामी पाच वर्षांत प्रभागातील उर्वरित विकासकामे अधिक जोमाने पूर्ण केली जातील.” ​या निर्णयामुळे प्रभाग १३ मध्ये प्रफुल्ल देवकर यांचे पारडे जड झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​

Tags: #elections#jalgaon_city#municipalcorporation#political
Next Post
‘प्रभाग १२-अ’ मध्ये ललितकुमार घोगलेंची ‘क्रेझ’; महाबळ, रामानंद नगर परिसरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

'प्रभाग १२-अ' मध्ये ललितकुमार घोगलेंची 'क्रेझ'; महाबळ, रामानंद नगर परिसरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add