जळगाव, दि. 27 – समाजातील आपल्या माणसांना प्राधान्य देऊन त्यांना मोठं करण्याची वृत्ती स्वीकारली गेली पाहिजे, राज्यात अनेक समाजातीळ लोकांचे वैद्यकीय महाविद्यालय आहे. मी देखील कौतुकाने सांगतो कि डॉ. उल्हास पाटील यांनी स्वकर्तुत्वातून वैद्यकीय महाविद्यालय उभारले आहे. त्याचा समाजाला नक्कीच अभिमान आहे. देशात लेवा समाजाच्या व्यकितीचं एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रागंणात विदर्भ लेवा समाज भ्रातु मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार राजूमामा भोळे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. के.डी. पाटील, विदर्भ लेवा समाज भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष विनोद हरी पाटील, उपाध्यक्ष गजानन प्रह्लाद भोळे,सचिव सुनील पद्माकर बढे, सहसचिव संजय निंबाजी पाटील, खजिनदार धनेश निवृत्ती खर्चे, संचालक सुधाकर विश्व्नाथ ढाके, डॉ.विकास शंकरराव बोरोले, नितीन सुरेश वराडे, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विजय हरी पाटील, डॉ.विलास भोळे, रवींद्र रामदास फिरके, अनिल रामचंद्र खर्चे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच समाजातील कर्तृत्वान व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात आला. पुढे बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले कि, पूर्वीच्या कालखंडात आरपट्टी-पारपट्टी, खान्देश, विदर्भ लेवा समाज अशा रेषा होत्यात. नातेसंबध देखील पोटजाती पाहून केले जात होते. अलीकड्च्या कालखंडात मात्र या रेषा अस्पष्ट होत चालल्या आहे हि चांगली बाब आहे. लेवा समाज हा विखुरलेला आहे.
डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे एकत्रीकरण करून संपूर्ण देशात सकल लेवा समाज हि काळाची गरज आहे. विविध क्षेत्रात आपल्या समाजातील लोकांचे मोठे योगदान राहिले आहे. या लोकांना प्राधान्य देऊन त्यांना मोठं करण्याची वृत्ती स्वीकारली गेली पाहिजे. संपूर्ण देशात लेवा समाजाचं एकमेव वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचं काम डॉ.उल्हास पाटील यांनी केले आहे. त्यांना प्राधान्य देऊन आपल्या माणसाला मोठे करा, असे आवाहन त्यांनी केले.
अनेकदा रुग्णांसाठी आम्ही लोकप्रतिनिधी डॉक्टरांना फोन करत असतो. तेव्हा आपल्या समाजाचे डॉक्टर शब्द खाली पडू देत नाहीत, हि समाजासाठी सकारात्मक बाब आहे. लेवा समाजाचं अस्तित्त्व टिकवायचं असेल तर राजकारणात देखील आपला टक्का वाढला पाहिजे असेही खडसे यांनी शेवटी सांगितले.
विदर्भ लेवा भ्रातृ मंडळाचे कार्य कौतुकास्पद – डॉ.उल्हास पाटील
विदर्भ लेवा भ्रातृ मंडळातर्फे समाजातील कर्तृत्वान व्यक्ती गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान केला जातो. आता समाजासाठी विविध उपयोगी ठरणार केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव मंडळातर्फे करण्यात आला असून हि आनंददायी बाब असल्याचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात लेवा समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही राज्याच्या इतिहासात लेवा समाजाने ठसा उमटविला. राजकारणात नाथाभाऊंसारखं व्यक्तिमत्व नाही. समाजाचे मास लीडर म्हणून नाथाभाऊं ओळखले जातात. विरोधकांनी कितीही हल्ले केले तरीही त्यातून सही सलामत बाहेर पडण्याची कला नाथाभाऊंकडे आहे. त्यामुळे त्यांचे नेतृतव हे समाजाला लाभल्याचा अभिमान असल्याचेही डॉ.उल्हास पाटील यांनी सांगितले.