• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंप्राळ्यात मशाल धगधगली! कष्टभंजन हनुमंताला साकडे घालून शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 4, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
पिंप्राळ्यात मशाल धगधगली! कष्टभंजन हनुमंताला साकडे घालून शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला

​जळगाव, (प्रतिनिधी) : पिंप्राळा परिसरातील प्रभाग क्रमांक ८ आणि १० मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी रविवारी शंकरराव नगर येथील कष्टभंजन हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून “बदलासाठी मशाल” हाती घेण्याचा आणि शिवसेनेच्या सर्व ८ उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

​हे आहेत प्रभागनिहाय उमेदवार:
​या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने प्रबळ उमेदवार मैदानात उतरवले आहेत:
​उज्वला कुलभूषण पाटील (८-अ), शोभा रवींद्र सोनवणे (८-ब), मयूर चंद्रकांत कापसे (८-क), पुनमचंद सुपडू पाटील (८-ड). ​आणि कौशल्याबाई उत्तम निकम (१०-अ), पुष्पा विठ्ठल चौधरी (१०-ब), हसीनाबी शेख शरीफ (१०-क), कुलभूषण वीरभान पाटील (१०-ड)

​प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे संघटक गजानन मालपुरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “ही लढाई हुकूमशाही आणि पैशांच्या जोरावर सत्ता गाजवू पाहणाऱ्यांविरुद्ध आहे. मतदारांनी अशा प्रवृत्तींना जागा दाखवून द्यावी आणि आपल्या हक्काचे, स्थानिक प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी महापालिकेत पाठवावेत.”

​नागरिकांचा बदलाचा सूर..
​पिंप्राळा भागातील नागरिकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आता आम्हाला केवळ पोकळ आश्वासने देणारे नको, तर दिलेला शब्द पाळणारे लोकप्रतिनिधी हवे आहेत.” यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, प्रतिभा कापसे, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कष्टभंजन हनुमानाचा जयघोष करत उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे.

Tags: #elections#jalgaon_city#shivasena
Next Post
भाजप उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; आ. राजूमामा भोळेंची प्रमुख उपस्थिती

भाजप उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; आ. राजूमामा भोळेंची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add