• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा ४ जानेवारीला जळगाव दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 29, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा ४ जानेवारीला जळगाव दौरा; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

​जळगाव, (प्रतिनिधी) : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा प्रस्तावित दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित यंत्रणांची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली.

​जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींचे ४ जानेवारी रोजी सकाळी ६.०० वाजता रेल्वेमार्गे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर ते ‘अजिंठा’ शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. विश्रामगृहावरून सकाळी ८.०० वाजता ते पुढील कार्यक्रमासाठी अजिंठा (छत्रपती संभाजीनगर) कडे रवाना होणार आहेत.

​उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी रेल्वे स्थानक परिसर आणि शहरात चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे चोख नियोजन करावे. रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता आणि अतिक्रमणे हटविण्याची मोहीम तात्काळ राबवावी. स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन करून जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा. दौऱ्याच्या मार्गावरील नादुरुस्त रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना सूचना दिल्या आहेत.

​या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपवनसंरक्षक राम धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
​

Tags: Jalgaon
Next Post
जळगाव मनपा रणसंग्राम : महायुतीचे ‘सस्पेन्स’ उद्या संपणार; भाजप स्वबळावर की युती?

जळगाव मनपा रणसंग्राम : महायुतीचे 'सस्पेन्स' उद्या संपणार; भाजप स्वबळावर की युती?

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add