• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेरमध्ये डॉ.परिक्षीत बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 21, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
अमळनेरमध्ये डॉ.परिक्षीत बाविस्कर नगराध्यक्षपदी विराजमान

​अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली आहे. डॉ. बाविस्कर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा ८,६४८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत अमळनेरच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे.

या निवडणुकीत मुख्य लढत ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिवसेना शिंदे गट’ अशी थेट पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानात डॉ. बाविस्कर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली जी शेवटपर्यंत कायम राहिली. डॉ. बाविस्कर यांना एकूण ३०,८५६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला मतदारांनी नाकारल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले.

​नगरपालिकेला ‘सलाईन’ लावून संजीवनी देणार – डॉ. बाविस्कर
विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी आपल्या विजयाचे श्रेय अमळनेरच्या जनतेला दिले. ते म्हणाले, “नगरपालिकेची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. मी शब्दाला जागणार असून, पालिकेच्या रडत असलेल्या गाड्याला ‘सलाईन’ लावून त्याला संजीवनी देण्याचे काम प्राधान्याने करेल. शहराचा कायापालट करणे हेच माझे आता एकमेव ध्येय असेल.”

डॉ. बाविस्कर यांच्या विजयाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी केली. या निकालामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून आगामी काळात अमळनेरच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
​

Tags: #politicalAmalner
Next Post
मातीचे आरोग्य आणि जलव्यवस्थापनातूनच लिंबूवर्गीय फळबागांची प्रगती – डॉ. हिमांशू पाठक

मातीचे आरोग्य आणि जलव्यवस्थापनातूनच लिंबूवर्गीय फळबागांची प्रगती - डॉ. हिमांशू पाठक

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add