• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुन्या वादातून मित्राचाच काटा काढला; खून करून मृतदेह धरणात फेकला

एमआयडीसी पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, दोन मित्र ताब्यात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 19, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जुन्या वादातून मित्राचाच काटा काढला; खून करून मृतदेह धरणात फेकला

​जळगाव, (प्रतिनिधी) : एकाच कंपनीत काम करणाऱ्या मित्रांमध्ये झालेल्या जुन्या वादाचे पर्यावसान भीषण हत्यांकाडात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका मित्राचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून नेव्हरे धरणात फेकून दिला. जामनेर येथील निलेश राजेंद्र कासार (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव असून, जळगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

​नेमकी घटना काय?..
​मयत निलेश कासार हा जळगाव येथील ‘एलटीआय फायनान्स’ कंपनीत कामाला होता. याच कंपनीत त्याचा मित्र दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ह.मु. शिरसोली) हा देखील कार्यरत आहे, तर भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ह.मु. शिरसोली) हा पूर्वी तिथेच कामाला होता. काही महिन्यांपूर्वी निलेश आणि भूषण यांच्यात किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भूषणने हा राग मनात धरला होता. ​सोमवार, १५ डिसेंबर रोजी फायनान्सच्या एका प्रकरणाच्या मंजुरीवर चर्चा करण्याच्या बहाण्याने भूषण आणि दिनेश यांनी निलेशला शिरसोली येथे बोलावले. तिथे चर्चा सुरू असताना पुन्हा वाद झाला आणि संतापलेल्या भूषण व दिनेशने दोरीने निलेशचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणाच्या पाण्यात फेकून दिला.

​असा लागला छडा..
​निलेश घरी न परतल्याने नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना निलेशची दुचाकी रामदेववाडी शिवारात बेवारस स्थितीत आढळली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. निलेशच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे शेवटचे बोलणे दिनेश आणि भूषणशी झाल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली.

​धरणात शोधमोहीम..
​संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१९ डिसेंबर) सकाळी पोलिसांनी नेव्हरे धरण गाठले. तिथे शोधमोहीम राबवून निलेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​मनमिळाऊ स्वभावाच्या निलेशचा अशा प्रकारे अंत झाल्याने जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
​


 

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव महापालिकेसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’; चव्हाण-भोळे जोडीवर मोठी जबाबदारी

जळगाव महापालिकेसाठी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; चव्हाण-भोळे जोडीवर मोठी जबाबदारी

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add