• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 1, 2025
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

​जळगाव, (प्रतिनिधी) : ​शहरातील शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे समाजसेवेचा वसा घेत भव्य रक्तदान शिबिर आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आणि गुरुवार, दि. ४ डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी या सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांना उत्साहाने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

​शिवनेरी ग्रुपचे प्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत शिव कॉलनी येथील चांदणी चौकातील मैदानात घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी प्रत्येक रक्तदात्याला एक हेल्मेट भेट म्हणून वाटप केले जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

दत्त जयंतीनिमित्त कीर्तन सोहळा..
​तसेच, श्री दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर कीर्तनकार ह.भ.प. रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत याच चांदणी चौकातील मैदानात पार पडणार आहे. भाविकांनी या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून महाराजांच्या अमृतवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवनेरी ग्रुप आणि पंकज पाटील मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

​

Tags: #shivnerigroupJalgaon
Next Post
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, 'टॉमी'ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

ताज्या बातम्या

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

June 27, 2026
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात
क्रिडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
शैक्षणिक

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

June 27, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश
आरोग्य

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल; पहिल्याच बॅचचे घवघवीत यश

June 26, 2026
रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत
गुन्हे

रावेर पोलिसांची धडक कारवाई: दोन सराईत दुचाकी चोर गजाआड; दोन मोटारसायकली हस्तगत

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group