• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोहर्रमनिमित्त सुन्नी ईदगाहवर वृक्षारोपण मोहीम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 6, 2025
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मोहर्रमनिमित्त सुन्नी ईदगाहवर वृक्षारोपण मोहीम

जळगाव, (प्रतिनिधी) : मुस्लिम बांधवांच्या नवीन वर्षाची सुरुवात तसेच पवित्र मोहर्रम महिन्याच्या निमित्ताने शहरातील अहले सुन्नत वल जमात आणि गुलामाने शोहदा-ए-करबला व गुलामाने अहेले बैत यांच्यातर्फे सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर येथे ‘शजरकारी’ (वृक्षारोपण) मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुन्नी ईदगाह ट्रस्ट आणि सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी मोहर्रमचे महत्त्व आणि इस्लाम धर्मात वृक्ष व निसर्गाच्या संवर्धनाला दिलेले महत्त्व यावर मार्गदर्शन केले. प्रेषितांच्या शिकवणीनुसार वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी शंभर कडुलिंबाची देशी रोपे लावून शजरकारी करण्यात आली. या मोहिमेला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सै. अयाज अली नियाज अली, इकबाल वझीर, शेख जमील, नाझीम पेंटर, हाजी रशीद कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इस्लाम धर्मात वृक्षारोपणाला मोठे पुण्य मानले जाते आणि विनाकारण वृक्ष तोडणे गुन्हा मानले जाते, या शिकवणीनुसार ही मोहीम राबवण्यात आली.

Next Post
गिरणा धरणात समाधानकारक जलसाठा; शेतकरी-नागरिकांना दिलासा!

गिरणा धरणात समाधानकारक जलसाठा; शेतकरी-नागरिकांना दिलासा!

ताज्या बातम्या

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
गुन्हे

विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री; अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई

August 27, 2026
पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पातोंडा शिवारातून खताच्या बॅगा लांबवणारी टोळी जेरबंद ; ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add