• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. आदिठाणा ६ यांच्यासह शोभायात्रेचे उत्साहात स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 4, 2025
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगावच्या पवित्र भूमीवर श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघाने आयोजित केलेल्या ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास २०२५’ या आध्यात्मिक महापर्वासाठी शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी संयम स्वर्णसाधिका, श्रमणीसूर्या राजस्थान प्रवर्तिनी महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.स. ‘सुधा’ आदी ठाणा ६ यांचा मंगल प्रवेश उत्साहात संपन्न झाला.

जळगावच्या चातुर्मास मंगल प्रवेश शोभायात्रेस काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानापासून सकाळी झाली. महिलांनी लाल साडी आणि पुरुषांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. महिलांच्या डोक्यावर मंगल कलश, पुरुषाच्या हातात घोषवाक्य फलक होते. ‘जैनम जयति शासनम्,’ व भगवान महावीरांचा जयघोष करत ही शोभायात्रा आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे विसर्जित झाली. यामध्ये महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा. ‘सुधा’, महासती डॉ. उदितप्रभाजी म.सा. ‘उषा’, महासती डॉ. हेमप्रभाजी म.सा. ‘हिमांशू’ महासती डॉ. इमितप्रभाजी म.सा., महासती उन्नतीप्रभाजी म.सा., महासती निलेशप्रभाजी म.सा. आदी ठाणा ६ यांचा आहे.

संघपती दलिचंद जैन म्हणाले की, ‘धर्मनगरी जळगावचे श्रावक-श्राविकांनी चातुर्माससाठी आलेल्या सहा साध्वींपैकी चौघांनी डॉक्टरेट मिळविली आहे. ज्ञानवंत महासतीजींकडून धर्म आणि आध्यात्म याची सखोल माहिती घेऊन आत्मोत्कर्ष साधावा.’ असे आवाहन करण्यात आले.

महासतीजी डॉ. सुप्रभाजी म.सा., महासती डॉ. हेमप्रभाजी म.सा.,महासती डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांनी उपस्थितांशी भावनिक होत संवाद साधला. जळगावकडे विहार करताना एका मराठी व्यक्तीने कोणत्या ठिकाणी जात आहात असा प्रश्न विचारला असता, जळगाव उत्तर ऐकून जळगाव म्हणजे, “सुईभर” जळगाव! क्षणभर वाटले की, येथे सुयांचा व्यवसाय असेल परंतु ही तर धर्मनगरी, केळीचे आगार, सुवर्ण नगरी आहे. सु म्हणजे सुरेशदादा, ई म्हणजे ईश्वरलालजी, भ म्हणजे भवरलालजी आणि र म्हणजे रतनलालजी या कर्तृत्वसंपन्न व्यक्तींमुळे जळगावचा लौकीक वाढविला असे डॉ. हेमप्रभाजी म.सा. म्हणाल्या. तर डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांनी ‘४’ अंकाची महती सांगितली. आज चार तारीख आहे आज मंगल प्रवेश झाला त्यामुळे हा दिवस विशेष आहे. F म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी धर्माला, O म्हणजे ऑब्झरवेशन, U म्हणजे तन, मन, धन आणि वेळ यांची युटिलीटी आणि R म्हणजे रेग्युलर होणे. धार्मिक प्रवचन, शिबिरे, चर्चासत्र आणि परीक्षा स्वाध्यायभवनात होतील, त्यात आपण सर्व हिरीरीने सहभागी होऊयात.

चातुर्मास काळात आपल्या आत्म्याकडे आपले मुख असायला हवे. व्यक्तीची वयपरत्वे बघण्याची दृष्टी बदलत असते. बाल्यावस्थेत बाळाचे तोड आईकडे असते, तारुण्यात पत्नीकडे तर वृद्धापकाळात मुलगा, सुनेकडे तोंड असते. आपल्या आत्म्याच्या उत्कर्षासाठी भगवान महावीरांचा संदेश घेत आपल्या समोर आम्ही सहा प्रतिनिधी येथे आलेले आहेत. या काळात धर्म आराधना, त्याग, तपस्या, ध्यान, संयम साधना करून आपला आध्यात्मिक उत्कर्ष साधावा. ८ जुलै पासून ‘आत्मोत्कर्ष’ या संकल्पनेवर आधारीत प्रवचनमालेस आरंभ होणार आहे, असे आवाहन महासतीजी डॉ. श्री. सुप्रभाजी म.सा. यांनी केले. महामंत्री अनिल कोठारी यांनी सूत्रसंचलन तर ऋणनिर्देश आत्मोत्कर्ष चातुर्मास समिति प्रमुख श्रीमती ताराबाई डाकलीया यांनी केले. गुरुमहाराजांच्या विहार सेवेत गेल्या २५ वर्षांपासून असलेले जोरावर सिंग तसेच १५ वर्षांपासून असलेल्या दीपाबेन यांचा धर्मसभेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

संघपती दलीचंद जैन, ईश्वरलालजी जैन, अशोक जैन, नयनतारा बाफना, प्रदीप रायसोनी, संघकार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, सुशिल बाफना, ज्योती अशोक जैन, संघउपाध्यक्ष सुरेंद्रजी लुंकड, विजयकुमार कोटेचा, कांतीलाल कोठारी, महामंत्री अनिल कोठारी, मंत्री अजय राखेचा, स्वरुप लुंकड, दिलीप चोपडा, शांतीलाल बिनायक्या, अनिल देसर्डा, नंदलाल गादीया, अमर जैन, प्रविण पगारिया, किशोर भंडारी, प्रकाश बेदमुथा, तारादेवी रेदासनी, विजया मल्हारा, संध्या कांकरिया त्याचप्रमाणे चेन्नई येथून सुरेश बेदमुथा जे डॉ. उदितप्रभाजी म.सा. यांचे संसारी बंधु आणि हेमप्रभाजी म.सा. यांचे संसारी बंधु नवरतनमल चोरडिया यांच्यासह श्रमण संघाच्या सदस्यांचा, श्रावक श्राविकांचा उपस्थितांत प्रामुख्याने समावेश होता.


Next Post
पाचोरा हादरले! बसस्थानकासमोर तरुणावर १२ गोळ्या झाडून हत्या, शहरात तणाव

पाचोरा हादरले! बसस्थानकासमोर तरुणावर १२ गोळ्या झाडून हत्या, शहरात तणाव

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group