• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तुकारामवाडीत गुंडांचा गोंधळ, घरांवर दगडफेक वाहनांची केली तोडफोड

एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० ते १३ जणांवर गुन्हे दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 16, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
तुकारामवाडीत गुंडांचा गोंधळ, घरांवर दगडफेक वाहनांची केली तोडफोड

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील तुकारामवाडी परिसरात मध्यरात्री सुमारे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान काही गुंडांनी गोंधळ घालत काही घरांवर दगडफेक केली, दमदाटी केली आणि वाहनांची तोडफोड करून गंभीर नुकसान केले. सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हि घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०, रा. तुकाराम वाडी) यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. संशयित आरोपी स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि ५-६ अज्ञात तरुणांनी मिळून हा हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमुद आहे. शारदा ठाकूर हे घरात पती व दोन मुलींसोबत घरात झोपलेल्या असताना अचानक दरवाज्यावर लाठ्या, काठ्या आणि दगडांचा मारा सुरू झाला. दरवाजा अर्धवट उघडल्यावर समोर गोलू ठाकुर व त्याचे साथीदार उभे होते. त्यांनी अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली.

नंतर या गुंडांनी पुढे कल्पना दिलीप बाविस्कर यांच्या घरात घुसून कल्पना आणि त्यांच्या सून प्रियंका प्रफुल बाविस्कर यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या दुचाकीचे नुकसान केले. यानंतर रुपाली विजय पवार यांच्या घराजवळील कूलर खाली फेकून फोडण्यात आला. वॉशिंग मशीन आणि पाण्याच्या टाक्याही फोडण्यात आल्या. तसेच सम्राट कॉलनीतील सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडून पल्सर मोटरसायकल व सायकलवरही दगडफेक करण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे तुकारामवाडीतील परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


 

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
परिचारिकेचा विनयभंग ; सुरक्षारक्षकालाही केली धक्काबुक्की !

परिचारिकेचा विनयभंग ; सुरक्षारक्षकालाही केली धक्काबुक्की !

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add