• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

पाचोरा तालुक्यात घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने बालकासह तरुणाचा मृत्यू !

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील अंतुर्ली येथील शेत शिवारात शेततळ्यात तरुणांसह बालक मजुरांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रवी परभत कोळी (वय १४, रा. पुनगाव ता. पाचोरा) असे बालकाचे तर पदमसिंग भगवान पाटील (वय २१, रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. पदमसिंग पाटील याचे पश्चात वृद्ध आई, एक विवाहित बहिण व रविंद्र कोळी याचे पश्चात आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे. गुरुवारी संध्याकाळी पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात शेततळ्यात पडून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके करीत आहेत. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Next Post
विवाहितेला चाकू लावत घरातून रोकड लांबविली !

विवाहितेला चाकू लावत घरातून रोकड लांबविली !

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add