• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धरणगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ७१ विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे : सीईओ करनवाल

जूनपासून शाळांमध्ये होणार आरोग्य तपासणी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 2, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
धरणगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ७१ विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहपूर्व लक्षणे : सीईओ करनवाल

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील शाळांमधील ७१ विद्यार्थी प्री-डायबेटीक अर्थात मधुमेहपूर्व आढळून आल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या दालनात बुधवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी सीईओ करणवाल यांनी सांगितले की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळा आणि कन्या शाळा यामधील इयत्ता १ ते ४थीच्या वर्गातील २४२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ७१ विद्यार्थी हे प्री-डायबेटीक अर्थात मधुमेहपूर्व असल्याचे आढळून आले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आकडा मोठा असून जिल्हा परिषदेने याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

धरणगाव तालुक्यातील पिंप्री या गावात झालेल्या तपासणीच्या धर्तीवर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सीईओ करणवाल यांनी सांगितले. तसेच व्हिल्स ग्लोबल फाउंडेशन या संस्थेसोबत करार करून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जंकफूडपासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी आहार बदलाची जनजागृती करावी लागणार आहे.

तसेच चपातीपेक्षा भाकरी बरी आणि फायबर असलले पदार्थ घरी देखिल देण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. आहारात बदल केल्यास प्री-डायबेटीक विद्यार्थी या संकटातून निश्चीतपणे बाहेर पडतील असा विश्वासही सीईओ मिनल करणवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नाशिक, नंदुरबार याठिकाणी देखिल विद्यार्थ्यांच्या आहार बदलाबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने चांगले परिणाम दिसून आल्याचेही सीईओ करनवाल यांनी सांगितले.

Next Post
दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम (कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न

दिव्यांग बांधवांसाठी मोफत कृत्रिम (कॅलिपर्स) अवयव वितरण शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group