• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला, वेरूळी गावावर शोककळा !

भडगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला, वेरूळी गावावर शोककळा !

भडगाव (प्रतिनिधी) : येथील जामदा डाव्या कालव्यात रविवारी वाहून गेलेल्या पाचोरा तालुक्यातील वेरुळी येथील सचिन रामू सोनवणे (वय २५) याचा मृतदेह सोमवारी सकाळी वलवाडीनजीक कालव्यावर असलेल्या पुलाच्या खाली आढळून आला. सचिनच्या मृत्यूमुळे वेरूळी गावावर शोककळा पसरली आहे.

चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तश्रृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणारा वेरुळी ता. पाचोरा येथील बारा तरुणांसह सचिन रामू सोनवणे (वय २५) हा तरुण खेडगावनजीक जामदा डावा कालव्यात पाय घसरून पडला. पाण्याचा प्रवाहात तो वाहून गेला. त्याच्या सोबत असलेल्या खेडगाव व वेरुळी येथील तरुणांनी त्याचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. रविवारी दि.६ रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

गिरणा धरणातून आवर्तन बंद केल्याने जामदा डाव्या कालव्याचे पाणी रात्रीतून कमी झाल्यानंतर मृतदेह आढळून आला. रविवारी खेडगाव येथील पोलीस पाटील कृष्णा हिरे, विजय सोनवणे, पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.टी. पाटील व नागरिकांची कालव्याच्या काठावर शोधमोहीम सुरू होती. त्या तरुणासोबतचे ११ तरुण देखील घटनास्थळी थांबून होते.

Next Post
विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया.. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया.. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ताज्या बातम्या

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’
जळगाव जिल्हा

सावधान! बालविवाहाचा प्रयत्न पडेल महागात; जळगाव प्रशासन ‘अलर्ट’

April 18, 2026
लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group