• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी धडकल्याने अपघात ; एक ठार, दोन गंभीर जखमी

भुसावळ तालुक्यात वरणगाव येथील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
दुचाकी धडकल्याने अपघात ; एक ठार, दोन गंभीर जखमी

भुसावळ, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव येथे श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळ वरणगाव ते बोदवड रस्त्यावर रविवारी दि. ९ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर जबर धडक होऊन यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

आचेगांव येथील शरद भास्कर पाटील (वय ७०) हे आपल्या दुचाकी (एम.एच. १९ ए .एस ६९९१) ने वरणगावकडून आचेगावकडे जात होते. बोदवड मार्गावरील श्री नागेश्वर मंदिराजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी (एम.एच. २८ बी.एस. ९१४१) वरील चालक शेख गनी शेख मन्यार (वय ६६) त्यांचे सोबत असलेल्या अशोक रामदास खराटे (वय ५५, दोघे रा. बोदवड) यांनी जबर धडक दिल्याने या अपघातात आचेगाव येथील शरद भास्कर पाटील गंभीर जखमी झाले. तिघांना वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद भास्कर पाटील यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या शेख गनी शेख मन्यार व अशोक रामदास खराटे या दोघांना उपचारार्थ जळगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने शरद पाटील यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी काही वेळ रुग्णालयात गोंधळ घातला. तर या अपघाताच्या घटनेप्रकरणी वरणगाव पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते. घटनेचा सपोनि जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रावण जवरे तपास करीत आहे.

Next Post
डिझेल चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

डिझेल चोरट्यांना पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

ताज्या बातम्या

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा
जळगाव जिल्हा

‘माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत डॉ. नितीन धांडे यांची पद्मश्री चैतराम पवार यांच्याशी पर्यावरण संवर्धनावर चर्चा

July 22, 2026
कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add