• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शाखा सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांची सक्रियता महत्वाची.. – डॉ. गोराणे

महाराष्ट्र अंनिसचा जिल्हा प्रेरणा मेळावा उत्साहात, हितचिंतकांचा केला सन्मान

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 10, 2025
in जळगाव जिल्हा
0
शाखा सक्षमीकरणासाठी कार्यकर्त्यांची सक्रियता महत्वाची.. – डॉ. गोराणे

जळगाव, (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक व्यक्ती विवेकी झाली पाहिजे, हे आपले ध्येय आहे. यासाठी प्रत्येक शाखेच्या पातळीवर सक्षमता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात सशक्त संघटन असलेली व संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे नेणारी चळवळ म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे प्रतिपादन राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा संकल्प व प्रेरणा मेळावा रविवारी दि.९ रोजी दिवसभर घेण्यात आला. बैठकीत राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी, राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी, तिन्ही जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी, नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर.बी. देशमुख हे होते.

मेळाव्यात समितीच्या कार्यकर्त्यांसह २५ हितचिंतकांचा प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्प देऊन सन्मान करून आभार व्यक्त करण्यात आले. यासह अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या देणग्या संकलन तसेच शाखेच्या साप्ताहिक बैठक व कामांचा आढावा घेण्यात आला. नविन २ वर्षाची जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चौधरी यांनी मनोगतात दोन वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रसंगी डॉ. प्रदीप जोशी आणि नेमिवंत धांडे यांनी, समितीच्या कामाविषयी समाधान व्यक्त करून भविष्यात कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने शाखावृद्धीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

यानंतर नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे गठन करण्यात येऊन नवीन सद्स्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी केले. आभार प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी मानले. मेळाव्यासाठी जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष आनंद ढिवरे, सचिव हेमंत सोनवणे, प्रा. दिलीप भारंबे, गुरुप्रसाद पाटील, दिनेश पाटील, मिनाक्षी चौधरी आदीनी परिश्रम घेतले.


 

Next Post
जळगावात प्रथमच खान्देश करिअर महोत्सव !

जळगावात प्रथमच खान्देश करिअर महोत्सव !

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group