• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बसमधून महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

अमळनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
बसमधून महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

अमळनेर, (प्रतिनिधी) : जळगाव ते दोंडाईचा बसमधून अज्ञात चोरट्यांनी साडे तीन लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना दि. ६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८ रा.गारखेडा ता. धरणगाव) ही महिला ६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शिंदखेडा तालुक्यातील वाघोदा येथे नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी जळगाव दोंडाईचा बस मध्ये बसली. बसमध्ये गर्दी असल्याने दोन महिलांनी तिला त्यांच्या बाजूला बसण्यास जागा दिली. बस अमळनेर शहरात आली असता पैलाड भागात शेजारी बसलेल्या दोन्ही महिला उतरून गेल्या. महिलेने आपली पर्स तपासून पाहिली असता पर्सची चेन उघडी दिसली. त्यात ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ४० ग्राम सोन्याच्या बांगड्या, तसेच २ लाख रुपये किमतीची ५० ग्रामचे मंगळसूत्र असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे समजले.

दरम्यान, यामुळे महिला आजारी पडली. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Next Post
दुचाकी अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group