• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकीचे शोरूम फोडणाऱ्या तिघांना अटक ; नशिराबाद पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 9, 2025
in गुन्हे
0
दुचाकीचे शोरूम फोडणाऱ्या तिघांना अटक ; नशिराबाद पोलिसांची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील वाहन शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दि. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांनी मध्यप्रदेशातून तिघांना खंडवा कारागृहात ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीना पोलीस कोठडी मिळाली आहे.

जळगाव-भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्यासमोर चौधरी टोयोटा या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये चोरट्यांनी शोरूमच्या डिलिव्हरी सेक्शनमधील दरवाजा तोडून प्रवेश केला. मोठी रोकड नसल्याने त्यांना फक्त १० ते ११ हजार रुपये मिळाले. चोरीपेक्षा मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने शोरूमचे मोठे नुकसान झाले. लॉकर, ड्रॉवर, कॅबिनेट आणि इतर वस्तूंची नासधूस करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तर दुसऱ्या घटनेत सातपुडा ऑटोमोबाईलमध्ये चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, तोडफोड करत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. चोरट्यांनी येथे तब्बल चार तास धुमाकूळ घातला. ते पहाटे चार वाजेपर्यंत शोरूममध्ये होते आणि हा संपूर्ण प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या घटनेत मध्यप्रदेशातील खंडवा कारागृहातून नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पथकाने संशयित आरोपी मेवालाल घिसिलाल मोहिते (वय ३०, रा. बोरगाव, मध्य प्रदेश) कमलेश उर्फ कालू मनालाल पवार (वय ४०, ग्रामरोसिया जि. खंडवा), अजय धूलजी चव्हाण (वय २२, रा. घटिया गराठे, मंदसौर) यांना दि. ८ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता अटक केली आहे. सदर संशयित आरोपी हे बऱ्हाणपूर येथील शिकारपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात अटकेत होते. त्यांनी नशिराबाद येथील गुन्हा कबूल केल्याने त्यांना नशिराबादच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. सपोनि ए.सी. मनोरे यांचे मार्गदर्शनाने तपास अंमलदार पोहवा योगेश वराडे, सोबत पोहवा युनूस शेख, पोहवा गिरीश शिंदे, पोकॉ आरिफ तडवी, सागर बिडे यांनी कारवाई केली आहे.

Next Post
‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर प.पू. श्री प्रविणऋषीजी म.सा. यांचे मार्गदर्शन

‘टेन्शन विरूद्ध मेडिटेशन’ वर प.पू. श्री प्रविणऋषीजी म.सा. यांचे मार्गदर्शन

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add