• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी मोफत योगासन वर्ग उत्साहात

डॉ.केतकीताई पाटील फाउंडेशनचा महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
महिलांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी मोफत योगासन वर्ग उत्साहात

जळगाव, (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. केतकीताई पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून मुली व महिलांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आज शनिवार दिनांक ८ मार्च रोजी बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथे मोफत योगासन व प्राणायाम वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शाळकरी मुलींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

माणसाच्या निरोगी आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम करणे खूप गरजेचे आहे. कुटुंबाच्या जवाबदाऱ्या सांभाळत असताना महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शारीरिक व्याधी तर होतातच परंतु मानसिक स्वास्थ्य देखील खराब होते. त्या दृष्टीने आज महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील यांनी मुली व महिलांसाठी प्राणायाम व योग वर्ग आयोजित केला होता.

बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरपंच शारदा पाटील, उपसरपंच दिव्या मतकर, ग्रामपंचायत सदस्य शारदा इंगळे, ज्योती इंगळे, व्यवस्थापन समिती प्रमुख छाया सुरवाडे, उपप्रमुख हिराबाई कोळी, माजी सरपंच बापू देशमुख, योगशिक्षक चैतन्य क्षीरसागर, शाळेचे मुख्याध्यापक अनिल बावस्कर उपस्थित होते.

याप्रसंगी योगशिक्षक चैतन्य क्षीरसागर यांनी योग आणि प्राणायामाचे महत्त्व विशद केले. उपस्थित विद्यार्थी आणि महिलांना योगासन आणि प्राणायामाची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले. सदर उपक्रम विद्यार्थी नियमित करतील आणि त्यांच्याकडून करून घेतले जाईल अशी ग्वाही मुख्याध्यापकांनी दिली. सूत्रसंचालन आणि आभार मुख्याध्यापक अनिल बाविस्कर यांनी मानले.

Next Post
मिथुन ढिवरे यांच्या ‘जनमानसांतील तुकोबा’ पुस्तकाचे प्रकाशन

मिथुन ढिवरे यांच्या 'जनमानसांतील तुकोबा' पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
खान्देश

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add