• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रविवारी जिल्हा बैठक

जिल्हा कार्यकारिणी निवडीसह कार्यकर्त्यांसह हितचिंतकांचा होणार सन्मान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रविवारी जिल्हा बैठक

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव जिल्ह्याची बैठक व जिल्हा प्रेरणा मेळावा रविवार दि. ९ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात डॉ. जगदीशचंद्र बोस सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह विविध शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि मुख्य कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी केले आहे.

बैठकीमध्ये निरीक्षक म्हणून राज्याचे प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे उपस्थित राहतील. तर मार्गदर्शक म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य प्रकल्प विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी, राज्याचे वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे, जिल्हाध्यक्ष नेमीवंत धांडे हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये नाशिक येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त मांडले जाणार आहे.

यासह अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या देणग्या संकलन, नविन २ वर्षाची जिल्हा कार्यकारिणी निवड तसेच शाखेच्या साप्ताहिक बैठक व कामांचा आढावा घेतला जाणार आहे. शाखा अहवाल सादर होणार आहे. तसेच, समितीला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील विविध शाखांच्या कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि मुख्य कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे, विश्वजीत चौधरी, प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी केले आहे.

Next Post
मधमाश्यांचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला, ८ जण जखमी

मधमाश्यांचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला, ८ जण जखमी

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add