• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेतर्फे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 7, 2025
in आरोग्य
0
बालरंगभूमी परिषदेतर्फे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील बालकांच्या सर्वांगिण कलाविकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषद व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.७ मार्च रोजी कलावंतांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील बालरंगभूमी परिषदेच्या सर्व शाखा या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत आहेत. बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे गोदावरी फाऊंडेशनच्या सहकार्याने आज (दि.७) सकाळी १० वाजता डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय संचलित महादेव हॉस्पिटल, जुने गणपती हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्‌घाटन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते होणार असून, या शिबिरात हृदयरोगतज्ञांकडून तपासणीसह टूडी इको – इसीजी, रक्तातील शुगर, रक्तदाब आदींची तपासणी करण्यात येणार आहे. तरी शहरातील कलावंतांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Next Post
शेतातील पाण्याची मोटार चोरणाऱ्या दोघं संशयितांना अटक

शेतातील पाण्याची मोटार चोरणाऱ्या दोघं संशयितांना अटक

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add