• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांजा तस्करी : सव्वालाखांच्या मुद्देमालासह तरूणाला अटक

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 24, 2025
in गुन्हे
0
गांजा तस्करी : सव्वालाखांच्या मुद्देमालासह तरूणाला अटक

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगव्हाण येथे गांजाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी १ लाख ३४ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. चोपडा ते धरणगाव मार्गावरील निमगव्हाण बसस्थानकाजवळ संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी एका स्कूटीस्वाराला थांबवले.

पोलिसांनी संशयित आरोपी अमित दिलीप बरडे (वय २२, रा. दोंदवाडे जोगवाडा, ता. नेवाली, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याची तपासणी केली असता, त्याच्याकडे एका पिवळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ७९,००० रुपये किंमतीचा ७ किलो ९१८ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच, पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत ५५,००० रुपये किंमतीचा ५ किलो ५६५ ग्रॅम गांजा देखील सापडला. पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर (क्र. एमपी ४६- झेडसी ६४४३) स्कूटी आणि आयफोन १५ मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, तो गांजा कुठून आणला आणि कुणाला पुरवठा करणार होता, याचा तपास सुरू आहे.

Next Post
नवदांपत्याने केले संत गाडगेबाबा जयंती निमित्त प्रतिमा पूजन

नवदांपत्याने केले संत गाडगेबाबा जयंती निमित्त प्रतिमा पूजन

ताज्या बातम्या

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
जळगाव जिल्हा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान
आरोग्य

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात
आरोग्य

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात

August 29, 2026
दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
गुन्हे

दुचाकीवरून पडल्याने नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

August 29, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

गोवंशाच्या मांसाची विक्री; संशयितास अटक

August 29, 2026
जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा

जिंकणं महत्त्वाचं; पण खिलाडूवृत्ती जपणं त्याहून महत्त्वाचं : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add