• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकीं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 6, 2025
in गुन्हे
0
दुचाकीं चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक ; १५ दुचाकी हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी दिली.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दुचाकींची चोरी करणारा सराईत गुन्हेगार विक्की नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघनगर, जळगाव) हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याचे समजले.

त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचारी प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी आणि योगेश घुगे यांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी विक्की भालेराव याला अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ५० हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी, विकास सातदिवे आणि रतन गिते हे करत आहेत.

Next Post
सुरज नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जनसंपर्क प्रमुख पदी निवड

सुरज नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या जनसंपर्क प्रमुख पदी निवड

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add