• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोदवडचे तहसीलदार नितीन देवरेंचे निलंबन ; बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची होती तक्रार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीअंती प्रशासनाची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
बोदवडचे तहसीलदार नितीन देवरेंचे निलंबन ; बांगलादेशींना जन्मदाखले दिल्याची होती तक्रार

भुसावळ, (प्रतिनिधी) : मालेगावात कर्तव्यावर असताना बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखला दिल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर मालेगावचे तत्कालीन व बोदवडचे विद्यमान तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना शासनाने सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचे निलंबन आदेश महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी गुरुवारी दिनांक २३ जानेवारी काढले आहेत.

बांगलादेशी नागरिकांना मालेगावात जन्मदाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशींना वारेमाप जन्मदाखले वाटप झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती व बांगलादेशींचे बेकायदा असलेल्या वास्तव्याबाबतही तक्रार केली होती.

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर व आरोपानंतर शासनाकडून दखल घेण्यात आली. गुरुवारी २३ जानेवारी रोजी बोदवडचे विद्यमान व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना शासनाने निलंबित केले आहे. धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. देवरे यांच्या निलंबन काळात जळगाव हे मुख्यालय असेल. शिवाय, त्यांना या काळात कोणताही व्यवसाय करता येणार नाही, तसेच धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल.

तक्रारीच्या चौकशीसाठी एसआयटी जन्म व मृत्यू नोंदणीसंद‌र्भातील तथा अधिकार जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. गृह विभागाकडे आलेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करू नये, असे उपसचिव महेश वरूडकर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Next Post
१५ वर्षीय अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत संपविले जीवन

१५ वर्षीय अल्पवयीन मुलाची झाडाला गळफास घेत संपविले जीवन

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add