• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एसटी बसचा अपघात ; शालेय विद्यार्थ्यांसह ३१ जखमी

धरणगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
एसटी बसचा अपघात ; शालेय विद्यार्थ्यांसह ३१ जखमी

भरधाव बस थेट विद्युत खांबाला धडकली

धरणगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दोनगावपरिसरात स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट इलेक्ट्रिक खांब्यावर जाऊन धडकली. घटनेत प्रवाश्यांसह शालेय विद्यार्थी असे ३१ जण जखमी झाले आहे. घटना शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी घडली आहे. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येत असताना हा अपघात झाला आहे.

धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) नेहमीप्रमाणे शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील (वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव) यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार झाल्यावर बसने विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घराकडे सोडल्याची माहिती मिळाली.

Tags: accident
Next Post
पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ताज्या बातम्या

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली
गुन्हे

एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई: मोटार सायकल चोरटा जेरबंद, गुन्ह्याची कबुली

July 3, 2026
कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी
जळगाव जिल्हा

कलावंतांसाठी ‘जीवनरंग’ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ३८ कलावंतांची झाली तपासणी

July 3, 2026
कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण
कृषी

कापूस पिकात पाणी बचतीचे धडे; सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील महिलांना प्रशिक्षण

July 3, 2026
चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!
गुन्हे

चोपड्यात आंतरजिल्हा टोळी जेरबंद; गावठी कट्टा, मॅगझिनसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

July 3, 2026
विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी
जळगाव जिल्हा

विभागीय महसूल आयुक्त यांनी केली विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांची पाहणी

July 2, 2026
बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार
आरोग्य

बायपास शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गंभीर हृदयविकारावर यशस्वी उपचार

July 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group