जळगाव, (प्रतिनिधी) : रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनाला किनगाव बु. जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अपघातातील जखमींना चोपडा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर विधानसभा मतदार संघात मतदारसंघातील Other polling officer म्हणून नियुक्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, कविता बाविस्कर, लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी वाहनाला अपघात झाला.
हा अपघात आज मंगळवारी सकाळी किनगाव बु. जवळ झाला. या अपघातातील जखमींना उपचारार्थ चोपडा येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी ६.०० वाजता थांबला. उद्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.