मुक्ताईनगर, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर शहरातील विविध प्रभागात जन आशिर्वाद रॅली काढून मतदारांशी संवाद साधत मतदारांचे आशिर्वाद घेतले.
यावेळी रोहिणी खडसे यांच्या जन आशीर्वाद रॅलीला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला प्रभागा प्रभागात महिला भगिनींनी रोहिणी खडसे यांचे औक्षण केले तर ज्येष्ठांनी विजयी भव चे आशीर्वाद दिले युवकांनी परिवर्तनाच्या लढाईत आम्ही सोबत असल्याचे रोहिणी खडसे यांना अश्वस्त केले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या गेले तिस वर्ष तुम्ही सर्वांनी आ एकनाथराव खडसे यांना खंबीर साथ आणि आशीर्वाद दिले, त्या खंबीर साथ आणि पाठबळावर आ. एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आणली गोरगरीब जनतेची सेवा करणे हे कर्तव्य मानून विरोधकांनी टिका केली तरी टिके कडे दुर्लक्ष करून सतत जनतेच्या सेवेत राहिले त्यामुळे जनतेने सतत सहा पंचवार्षिक त्यांच्यावर विश्र्वास टाकला. त्यांच्याकडून जनसेवेचा वसा वारसा घेऊन आ एकनाथराव खडसे, रविंद्र भैय्या पाटील, अरुण पाटील, राजाराम महाजन, उदयसिंह पाटील आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवडणूक लढवत असुन मला आशीर्वाद देण्याचे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.
रोहिणी खडसे यांच्या प्रचारार्थ आज शरदचंद्र पवार यांच्या सभेचे आयोजन
महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ आज मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वा. तालुका क्रिडा संकुल मैदान मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीतर्फे ही सभा आयोजित केली आहे.
२०१९ विधानसभा निवडणूकीत विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती. परंतु निवडून आल्यावर आमदार पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. या घडामोडी दरम्यान ऑक्टोबर २०२१ मध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आता रोहिणी खडसे या पक्षाच्या उमेदवार आहेत.