• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी शहरातील डॉक्टरांशी साधला संवाद

निवडणूक लढण्याबाबतची भूमिका केली स्पष्ट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी शहरातील डॉक्टरांशी साधला संवाद

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉक्टरांच्या समस्या विधानसभे मधे मांडण्यासाठी माझं वचन असेल आणि माझ्या प्रत्येक कृतीत तुमच्यासाठी दिलेला शब्द असेल. तुमच्या प्रत्येक व्यथा, तुमच्या समस्यांचा अंतिम निकाल लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एक नविन परिवर्तन आणण्याचा निर्धार मी केला आहे असे वक्तव्य मनसेचे अधिकृत उमेदवार अनुज पाटील यांनी केले.

शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक आयएमए हॉल या ठिकाणी पार पडली. बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. पाटील यांनी निवडणूक लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व डॉक्टरांच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचा समाधान करण्याकरता माझी उमेदवारी आहे असे आश्वासन दिले.

तुमच्या समस्या ऐकण्यासाठी, तुमच्या व्यथा समजून घेण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. आज डॉक्टरांवर संकटाचं सावट पसरलं आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णालयांवर होणारे हल्ले, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणारा त्रास, महापालिका प्रशासनातील अग्निशमन दलातर्फे होणारा त्रास, शासनाच्या किचकट नियम व अटी यामुळे रुग्णालय चालवणे अतिशय जिकरीचे काम झाले आहे. परंतु, हे संकट आपण एकजुटीने पार करू शकतो, त्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे व आपल्या हक्काचा प्रतिनिधी विधानसभेत गेला पाहिजे अशी आग्रही भूमिका ही डॉ.अनुज पाटील यांनी मांडली.

तुमच्या कष्टाचं मोल, तुमच्या सेवेला सलाम, आणि या लढाईला माझ्या पूर्ण ताकदीने साथ देणार आहे. चला, आता जळगावातील डॉक्टरांच्या स्वाभिमानासाठी उभे राहूयात. तुमचं असलेलं विश्वास मला बळ देईल आणि हा विश्वास तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान बनून परत येईल असेही डॉ. अनुज पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले

यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ.सुनील गाजरे, सचिव डॉ अनिता भोळे, डॉ.अनिल पाटील, डॉ विलास भोळे, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.सुनील नाहटा, डॉ.राजेश पाटील, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.सुदर्शन नवाल, डॉ.अजय सोनवणे, डॉ.अभिजित पाटील, डॉ.नरेंद्र भोळे, डॉ.लीना पाटील यांच्यासह शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Tags: #jalgaon_city#political
Next Post
रांगोळ्या, पुष्पहाराने आ.राजूमामांचे जोरदार स्वागत ; जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

रांगोळ्या, पुष्पहाराने आ.राजूमामांचे जोरदार स्वागत ; जेष्ठांनी दिले शुभाशीर्वाद

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group